Devendra Fadnavis: 'नितीन गडकरींच्या धमकीमागे अजून किती जण याचा तपास सुरु'; फडणवीसांची माहिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, हा धमकीचा फोन एका आरोपीने कर्नाटकातील बेळगावमधील तुरुंगातून केल्याचे तपासात उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय, यामागे नेमकं कोण? तुरुंगातून फोन कसा काय केला जाऊ शकतो? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. नागपुरातील रेशिमबागेत आयोजित एका विशेष बैठकीसाठी ते आले होते