विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. त्यात भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ठाण मांडले आहे. त्यांनी भाजपा पक्षातील सर्व अपक्ष उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. असे असतानाच नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपा कोणाला पाठिंबा देणार यावर बोलताना गिरीश महाजन यांनी सूचक विधान केले आहे.
#SatyajeetTambe #GirishMahajan #PrakashAmbedkar #UddhavThackeray #VBA #Shivsena #NarayanRane #BJP #DevendraFadnavis #Nashik #MLC #Nagpur #Congress #Maharashtra