शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लदाखच्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. यासाठी ते खारदुंगा येथे ४० डिग्री सेल्सिअस तापमानात २६ जानेवारीपासून ५ दिवसांच्या लाक्षणिक उपोषणाला देखील बसणार आहेत. हा केवळ जागतिक तापमानवाढचा प्रश्न नाही, तर स्थानिक पातळीवर होणाऱ्या प्रदुषणाचा देखील यामध्ये वाटा आहे, असं वांगचुक यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लदाखच्या पर्यावरणाला औद्योगिकदृष्ट्या फटका बसू नये, यासाठी पंतप्रधानांनी दखल घेण्याचं आवाहन वांगचुक यांनी केलं आहे.