चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता भाजपानेही मोर्चेबांधणी सुरू केलीये. 'ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही महाविकासआघाडीच्या नेत्यांशी उद्यापासूनच बोलणी सुरू करतोय. त्यांच्या भेटी घेऊन त्यांना आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र देणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत' असं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं.