मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद काही केल्या संपायचं नाव दिसत नाही. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अशात आता शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले असून पवारांनीच संजय राऊत यांना शिवसेना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचं म्हंटलं.
#SharadPawar #ShivSena #PratapraoJadhav #SanjayRaut #UddhavThackeray #NCP #EknathShinde #Buldhana #PrakashAmbedkar #VBA #VanchitBahujanAghadi #Maharashtra #HWNews