'जो हिंसाचार घडवतो जसं मोदी आहेत, अमित शाह आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा अजित डोवल असतील ते या वेदना काय असतात? हे समजू शकणार नाहीत. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील तेव्हा काय वाटलं असेल ते मी समजू शकतो माझी बहिण समजू शकते' असे म्हणत त्यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कशी समजली? ही घटना आज राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या भाषणात बोलून दाखवली.