केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. इंग्रजीमधून बजेट सादर झाल्याने आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'हिंदी राष्ट्रभाषा असल्याने देशाच बजेट हे हिंदीमधून सादर व्हायला पाहिजे होतं. भाजपा ही संस्कृती जोपासणारी पार्टी असल्याने पुढील अर्थसंकल्पीय बजेट हे हिंदीतून सादर व्हावे' अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.