Bigg Boss 16 शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात ट्रॉफी जिंकण्यासाठी सदस्यांची चढा-ओढ सुरु झाली आहे. बिग बॉसचे यंदाचे पर्व मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने गाजवले. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली. शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.
सौजन्य: शिव ठाकरे, कलर्स टीव्ही