ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. औरंगाबाद येथील वैजापूर तालूक्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील महालगावी येथे आदित्य ठाकरेंच्या सभेत काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमच्यावर गाडीवर दगडफेक झाल्याचं देखील सांगितलं. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.