आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी आणि ठाण्यातून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे. यावरून शिंदे गट आक्रमक झाला असून आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं जातंय. याच प्रकरणात आता आमदार रवी राणा यांनी उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभं राहावं. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे.