काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानच मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला. असे अनेक प्रकार रोज घडत असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत अराजक आणि अनागोंदी सुरू आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर विरोधकांवरील हल्ल्यांमागे कोणतं षडयंत्र तर नव्हे?, असा सवालही त्यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.