आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागल्याचं चित्र आहे. गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीमधील उत्सुकता वाढली असून सर्वसामान्यांचही याकडे लक्ष लागलं आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेपुढे काय आव्हानं असतील? कोणते मुद्दे चर्चेत असतील यावर 'लोकसत्ता'च्या लोकसंवादमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...