Navneet Rana यांचा पाकिस्ताला टोमणा अन् पंतप्रधान मोदींचं कौतुक | Loksabha | Amravati
महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत २०२३च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मोदी सरकारचे कौतुक केले. करोनाच्या दोन वर्षांच्या काळात हा देश ज्या परिस्थितीतून गेला आहे, त्यानंतर देशाला इतका स्थिर ठेवता येईल, अशी अपेक्षा नव्हती पण आर्थिक आणि आर्थिकदृष्ट्या आज आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलो आहोत' असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. 'बाकी देशांवर नजर टाकली तर आज पाकिस्तानात एक किलो मैदा २०० रुपये किलोने मिळतो' असे वक्तव्य करत त्यांनी पाकिस्तानला टोमणा मारला.