अनेकदा आळस घालवण्यासाठी चहा- कॅाफीचं सेवन केलं जातं. काहींना तर चहा-कॅाफीच्या सेवनाशिवाय दिवस चांगला गेला असंही वाटत नाही. मात्र कोणत्याही पदार्थ वा पेयाचं अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. अनेकांना माहीत नसेल, परंतु कॅाफी आणि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं एक महत्त्वाचं नातं आहे. कॅाफीचा कोलेस्ट्रॅालवर नेमका कसा परिणाम होतो? हे आपण जाणून घेऊ.