'उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आयोगाला निवडणूक घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र, त्यात पक्षांमधील वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? यावर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले, तर त्यांना न्याय मिळेल' अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.