मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार | New Governor Ramesh Bais | Maharashtra
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.