शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा, आमदाराचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर टीका करतांना ते सुसाट सुटले आहेत. शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी तर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच पक्षात येण्याची ऑफर देत डिवचले आहे. ज्या ठाकरेंच्या विरोधात बंड केले, त्याच ठाकरेंना आता आमच्या शिवसेनेत या, असे म्हणत भुमरेंनी टोला लगावला आहे.
#UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #PMModi #SanjayRaut #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #BJP #AdityaThackeray #Maharashtra