पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली असा हल्लाबोल केंद्रीमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला दानवे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधत स्वार्थी भाजपाला चिंचवडमधून हद्दपार करण्याचे आवाहन जनतेला केले होते. आढावा बैठकीला भाजपा आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.