CM Shinde on MPSC Students:आंदोलक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन; आंदोलन मागे घेण्याची विनंती
एमपीएससीची नवी परीक्षा पद्धत ही २०२५ पासून लागू करण्याचा आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी कालपासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे विद्यार्थी रात्रभर बालगंधर्व चौकात बसले होते. सकाळी कॉँग्रेसचे नेते अतुल लोंढे विद्यार्थ्यांसोबत आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला. 'राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गासोबत राज्य सरकार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत २०२५पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यावर आयोग देखील लवकरच निर्णय घेणार असल्याने आंदोलन मागे घ्यावे'