मागील ३६ तासांपासून पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावर टीका करताना भाजपा नेते Pravin Darekar यांनी 'विरोधात असल्यामुळे एमपीएससीच्या प्रश्नावर शरद पवार यांची नौटंकी सुरू आहे का?, एसटीचे कर्मचारी घरापर्यंत आले तेव्हा सत्तेत असलेल्या शरद पवारांनी दुर्लक्ष का केलं?' असे सवाल उपस्थित केले.