राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारलं आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू आहे. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनस्थळाला भेट देऊन अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. महिलांवर अन्याय करणारं हे सरकार आहे, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टोला लगावला आहे.