कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीन वाजण्याच्या रॅली होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या निवडणुकीत हेमंत रासने प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच 'कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन ही पक्षात मोठ्या प्रमाणावर राजकीय भूकंप होणार आहे' असा इशाराही त्यांनी दिलेला पाहायला मिळाला