'देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजपाकडून राजकीय पार्टीना त्रास देण्याच काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर होतो. शिवसेना एकाच्या हातून काढून दुसऱ्याच्या हाती देण्याचं काम केलं गेले. निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या हातात दिली नाही. निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितलं आहे' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात दिली.