चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. अपक्ष उमेदवार देखील तितकाच जोर लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यासारखे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले. परंतु, चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना काय वाटतं, कोणाची ताकद जास्त आहे, समस्या काय आहेत हे जाणून घेतले आहे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी..