Kasba Byelection: "माझ्या पाठीशी जनता"; Hemant Rasne यांनी बजावला मतदानाचा हक्क
कसबा विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्या उपोषणावर देखील भाष्य केलं. हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी होतं. गेल्या निवडणुकीतही त्यांनी अशीच स्टंटबाजी केली होती, अशी टीका रासने यांनी केली आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करीत आलो आहे. आता पक्षाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक लढवित असून माझ्या पाठीशी जनता आहे. त्यामुळे मी प्रचंड बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.