मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे. येत्या 23 एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसाला किंवा वन डे वर्ल्ड कपदरम्यानच्या सोहळ्यात पुतळ्याचं अनावरण पार पडेल. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी असून त्याच मैदानात आता सचिनचा पुतळाही उभारला जाणार आहे.