हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भोवणार असल्याचं चित्रं आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राणेंनी केली.
#NiteshRane #SanjayRaut #CabinetExpansion #MaharashtraBudget #MaharashtraAssembly #BudgetSession #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews