हे विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ आहे, या खासदार संजय राऊतांच्या विधानाने आता वादंग निर्माण झाला आहे. विधानसभेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसतं तर तो खासदार पण झाला नसता, असा एकेरी उल्लेख करत राणेंनी टीकास्त्र डागलं.