ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रभू म्हणाले की, संजय राऊत हे विधीमंडळाचे सदस्य नाही. तरही त्यांच्या वक्तव्याचा विधीमंडळात नको इतका सत्ताधाऱ्यांनी कांगावा केला. त्याची दखल घेतल अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राऊत यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. असं असेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर काय कारवाई करणार, असा सवाल सुनील प्रभू यांनी थेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विचारला आहे.
#SunilPrabhu #EknathShinde #RahulNarvekar #DevendraFadnavis #BJP #Shivsena #NCP #Congress #SanjayRaut #MNS #Vidhansabha #MaharashtraAssembly #RaosahebDanve #Jalna #SupremeCourt #Maharashtra