गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच कॉँग्रेस नेते रमेश बागवे यांनी प्रतिक्रिया देताना 'फुले शाहू आंबेडकर अन् निवडून येणार धंगेकर' असे वक्तव्य केले आहे. 'रवींद्र धंगेकरने देशाच्या गृहमंत्र्याला हलवलंय' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.