ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळे बुधवारी (1 मार्चे) विधिमंडळातील वातावरण चांगलंच तापलेलं. राऊतांच्या विधानावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्देशांनुसार विधिमंडळात 15 जणांची हक्कभंग समितीची देखील स्थापना करण्यात आली. पण या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
#SharadPawar #SanjayRaut #Kasba #Chinchwad #UddhavThackeray #DevendraFadnavis #RavindraDhangekar #AshwiniJagtap #BypollElections #Politics #PuneNews #MarathiNews #Maharashtra