कसबा पेठ मतदारसंघात मविआच्या रवींद्र धंगेकरांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत हा विजय साजरा केला.
कार्यकर्त्यांकडून धंगेकर यांचं कसबा मंदिर परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर रवींद्र धंगेकर आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी कसबा गणपतीच दर्शन घेतल्यानंतर आरती देखील केली. यासह दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतलं.