गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आणि महाराष्ट्रातही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपानं जागा राखली असताना दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. दरम्यान या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले की “देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत.
#SharadPawar #KasbaPeth #SanjayRaut #MNS #SandeepDeshpande #SSushmaAndhare #DevendraFadnavis #BJP #Politics #MarathiNews #Maharashtra