विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समस्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसल्याची खंत व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.