राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी यावर उत्तर देत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र त्यावर ठाकरेंनी अद्याप ब्र देखील काढला नाही, असं ते म्हणाले.