देहूत मोठ्या उत्साहात जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी या सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले होते. आठ दिवसांपासूनच देहूत वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळाली. या सोहळ्याची वारकरी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षीचा हा ३७५ वा वैकुंठ गमन दिवस होता.