महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७वा वर्धापन दिन असून आज पक्षप्रमुख राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही महिन्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळातम मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. 'भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं. असो, हे सगळे २२ मार्चचे विषय आहेत' असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला.