पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षाच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्याला दहा वर्षाच्या नातीने मारून पळवून लावल्याची घटना घडली आहे. चोराला पळवून लावणार्या ऋत्वी वाघ हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे