अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली. त्यानंतर हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीने छापा टाकला यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या कारवाई संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सुतोवाच केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत सोमय्यांचा तोतरा असा उल्लेख केला होता. त्याचाही समाचार घेत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान दिलं आहे