राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. याविषयी बोलताना 'शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे याचा परिणाम राज्यातील अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. सरकारने संघटनेसोबत चर्चा केली पण तोडगा निघाला नाही. आंदोलनातून मार्ग काढायचा प्रयत्न सरकारने केले पाहिजे. सरकारने विश्वासात घेऊन सांगितले पाहिजे. देशातील काही राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे' अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.