राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलंच घेरलं आहे. याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून देखील या अधिवेशनात पडसाद उमटले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. या व्हायरल व्हिडिओमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. मात्र मुद्दा असा आहे की या प्रकरणात फक्त शीतल म्हात्रेच बोलताना किंवा पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. पण प्रकाश सुर्वे याबाबत का बोलत नाहीत? असा प्रश्न सध्या अनेकजण विचारत आहेत. तर दुसरीकडे या व्हिडिओमागे प्रकाश सुर्वेंच्या मुलाचाच हात होता असाही आरोप आता करण्यात येतोय.
#SheetalMhatre #PrakashSurve #ViralVideo #SanjayRaut #VarunSardesai #EknathShinde #MaharashtraAssembly #AdityaThackeray #Yuvasena #Shivsena #VidhanBhavan #Goregaon #Dahisar #Maharashtra