'संजय राऊतांनी बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले. शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडून घेतलेली आहे. अशी टीका शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 'चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण आहे, जी तुमच्याकडे बघितलं तर हे सत्य आणि जाणीव होते' असा खोचक टोलाही मस्के यांनी राऊतांना लगावला.