Devendra Fadnavis Poem: रामदास आठवलेंच्या कवितेचा आधार घेत फडणवीसांची जोरदार टोलेबाजी
आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झालं. या बंडाचं कारण शिवसेनेवर निधीबाबत राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेला अन्याय सांगण्यात येत होतो. पण, अर्थसंकल्पात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे गट आणि भाजपाच्या मंत्र्यांच्या खात्याला किती निधी मिळाला याची आकडेवारी वाचून दाखवली होती. याला आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.