आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकमधून शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. या मोर्चावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांनाच सुनावलं आहे. आपल्या शेतमालाला भाव कोणता पक्ष देईल हे शेतकऱ्यांनी पाहायला हवं, मात्र ते तसं करत नाहीत. असे किती मोर्चे आले आणि गेले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.