आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या नावारती सोमवरी आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे, ती म्हणजे त्यांनी प्रथमच सेमी-हाय स्पीड ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सोलापूर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालवली. याबाबतची माहीती मध्य रेल्वेने ट्विट करत दिली होती. अशातच आज सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जो मध्य रेल्वेने ट्विट केला आहे. ज्यामध्ये केबीनमधून दिसणारा अद्भुत नजारा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.