'माझ्या मालमत्तेविषयी ४ महिन्यांपूर्वी नोटीस आली होती. माझा सरकारी सहाय्यक याला देखील नोटीस देण्यात आली आहे. माझ्या घरावर बँकेचं कर्ज आहे त्याला देखील नोटीस आली. माझी पत्नी, माझे मोठे बांधु आणि मोठी वाहिनी यांनादेखील नोटीस आल्या आहेत. २० तारखेला सकाळी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे' अशी माहिती राजन साळवी यांनी दिली. याचबरोबर 'राजन साळवी काय आहे हे संपूर्ण मतदारसंघाला माहित आहे. मी कुठल्याही चौकशी घाबरत नाही' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.