२६ जुलै २००५ रोजी झालेल्या तुफान पावसानंतर मुंबईत सर्वत्र पूर आला आणि सुमारे ८५० मुंबईकरांचे बळी गेले. अब्जोवधींची वित्तहानी झाली. खरे तर ही हानी अधिक मोठी होणार होती. पण जगातील एका महत्त्वपूर्ण नैसर्गिक आश्चर्याने मुंबईकरांना आणि मुंबईला अक्षरशः वाचवले, त्याची ही कथा