मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खेडमधील झालेल्या सभेवर टीका करताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, "जेव्हा एखादा पेपर फुटतो, तो पेपर फुटल्यानंतर त्याची कॉपी घेऊन त्यांची उत्तर पत्रिका लिहली जाते तशी कालची सभा होती. कालची सभा म्हणजे 'ढ' विद्यार्थ्यांची सभा असून ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत" याचसोबत 'रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर आहे' असा टोलाही लगावायला ते विसरले नाहीत.