परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही. पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे विकतात आणि नाही बोलणाऱ्यांचे गहूदेखील विकत नाही. याचं उदाहरण देत पंकजा मुंडेंनी श्रेय वादावरून अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. परळी तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.