हीच पुण्याची राजकीय संस्कृती!; कसब्यातील निवडणुकीनंतर रवींद्र धंगेकरांनी मानले हेमंत रासनेंचे आभार
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या विकास निधीमधून कसबा गणपती मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या पाच भित्तिचित्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अॅड. प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी धंगेकर यांनी कसबा विधानसभेतील आपल्या विजयावर भाष्य केलं. ते म्हणाले की, 'मला हेमंत रासने यांच्यामुळेच देशभरात नागरिक ओळखायला लागले. तसेच आम्ही दोघे मित्र असून निवडणुकीच्या काळात भेटू शकलो नाही. आता आम्ही दोघे मतदार संघाच्या विकास कामासाठी एकत्रित काम करणार आहोत'